TOTAL ASSOCIATED MEMBER : 98

आमच्याबद्दल


महाराष्ट्र राज्याचे गौरवशाली इतिहास व मराठी माणसाचे देशाप्रती असणारे प्रेम, समर्पण ह्याची प्रचिती संपूर्ण जगाला आहे. महाराष्ट्र राज्यातील CAPF जवान आपले प्राणपणाला लावून देशाच्या कानाकोपऱ्यात देशाची अखंडता आणि आंतरिक व बाह्य आक्रमणापासून संरक्षण झाले पाहिजे म्हणून तटस्थ उभा आहे. त्यांचे हे समर्पण आणि आपला देश हा सदैव अखंड राहावा या उद्देशपूर्तीसाठी करत असणाऱ्या कार्याला बळ आणि चेतना देण्यासाठी हि संस्था कार्य करत आहे.

भारतीय CAPF जवान कन्याकुमारी पासून ते कश्मीर व कच्छ रन पासून हिमाचल प्रदेशच्या अगदी शेवटच्या गावा पर्यंत अतिशय दुर्गम भागात आपल्या कर्तव्यांचे निर्वाहन करत आहेत. अशा ठिकाणी जवानांच्या मुलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत. पण अशा ह्या मातृभूमीच्या सेवेकऱ्यांना आपल्या पारिवारिक जीवनापासून, आपल्या पाल्यांच्या प्रेमापासून वंचित तर रहावेच लागते त्याच बरोबर समाजातील अनैतिक व्यवहारामुळे CAPF जवानाला आर्थिक, पारिवारिक व सामाजिक हानीला पण सामोरे जावावे लागते. गेली ०५ वर्षांपासून राज्यभरातील अनैक CAPF जवानांना संघटित करण्यासाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहेत त्या कार्याला आज यश संपादन होत आहे.

सदर संस्था हि प्रामुख्याने आपल्या सर्व CAPF जवानांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्या हक्कांचे व परिवाराचे संरक्षण, त्यांच्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण, रोजगार आदींसाठी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहील.