Events
अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप रामचंद्र कडूसकर, सेवानिवृत्त उपनिरीक्षक (अनुसूचिविय), सीमा सुरक्षा बल यांनी सीआयएसएफ हेडकॉटर उरण ओएनजीसी मुंबई येथे संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली तसेच जवानांच्या समस्या समजून घेतल्या त्यांना सर्विस मॅटर विषयी माहिती, इन्कम टॅक्स मध्ये रिबेट कसा घेऊ शकता, तसेच सी ए पी एफ आयुष्यमान, मेडिकल क्लेम विषयी माहिती दिली, आणि सर्वात महत्त्वाचे एनपीएस NPS विषयी माहिती दिली त्यामध्ये एनपीएस कसे काम करते, NPS मध्ये पैसे कसे जमा होतात व त्यांचा फंड सरकार द्वारे कसा गुंतवला जातो , आपले NPS मध्ये जमा झालेले पैसे किती आहेत, त्यावर इंटरेस्ट रेट किती भेटतो, जर तो वर्तमान मार्केट रेट पेक्षा कमी असेल तर, एनपीएस स्कीम कशी चेंज करायची या सर्व विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले .