TOTAL ASSOCIATED MEMBER : 98

संस्थेचे उद्देश्य

संस्थेचे उद्देश्य

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरिक व परकीय धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे. ज्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:-
१. सीमा सुरक्षा दल
२. केंद्रीय राखीव पोलीस दल
३. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
४. भारत-तिबेट सीमा पोलीस दल
५. सशस्त्र सीमा दल
६. आसाम रायफल्स
या दलांच्या अखत्यारीत येणाऱ्या अन्य केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये सेवा देणारे वा निवृत्त्त झालेले, मुख्य आश्रित या संस्थेचे सभासद असतील अशा सर्व महाराष्ट्र राज्यातील जवानांच्या व त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी व त्यांना उदभवणाऱ्या समस्यांचे एक राज्यस्तरीय/ जिल्हास्तरीय संस्था/ बोर्ड स्थापन करून उपाययोजना करणे.

२. CAPF जवानांमध्ये वाढत्या आत्महत्येची कारणे शोधणे व त्यावर प्रतिबंधक रीतसर उपाय योजना करणे.

३. सेवानिवृत्त वा शहीद झालेल्या CAPF जवानांच्या वीर पत्नी व त्यांच्या पाल्यांसाठी राज्य शासनाच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवण्या संदर्भात कागदोपत्री राज्य व केंद्र शासनाकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करणे.

४. सेवानिवृत्तीनंतर आर्थिक विकास करीता काम करण्यास इच्छुक असणाऱ्या CAPF जवानांना राज्य/ केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत सक्रिय कार्य करणे.

५. CAPF मध्ये कार्य करणाऱ्या पीडित जवानांना कायदेविषयक सल्लागार उपलब्ध करून देणे. जवानांचे मनोधैर्य वाढवण्याबाबत समुपदेशन करणे.

६. CAPF जवानांच्या पाल्यांसाठी शासनाच्या व संस्थे मधील सभासदांच्या सहयोगाने वैदयकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी प्रभावी कार्य करणे.

७. वैद्यकीय उपचारासाठी जवानांना सोईचे होणेकरिता आयुष्यमान पैनल मधील हॉस्पिटलांची संख्या वाढविण्यासाठी राज्य/ केंद्र शासनासोबत पत्रव्यवहार करणे.

८. गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या CAPF जवान वा त्यांच्यावर आश्रित असणाऱ्या सदस्यांच्या उपचाराकरिता मार्गदर्शन करणे.

९. खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवले गेलेल्या जवानांचे संरक्षण करणे व कायदेविषयक सल्लागार उपलबध करून देणे तसेच जवानांचे त्या बाबत मार्गदर्शन करणे.

१०. CAPF जवानांचे/ परिवारांच्या समस्यांचे समाधान करणे व त्याबाबत समुपदेशन करणे.

११. महाराष्ट्र राज्यातील मुख्य शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या CAPF जवानांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाची स्थापना करणे व चालवणे.

१२. जिल्हास्तरीय CAPF संघटना/ संस्था फक्त CAPF जवानांसाठी सक्रिय कार्य करत असतील व या संस्थेद्वारे निर्धारित केलेल्या अटी शर्ती मान्य करतील अशा इच्छुक संस्थांना/ संघटनांना समाविष्ट करून घेणे.

१३. CAPF जवानांचे समस्या ऐकून घेण्यासाठी वा मदतीसाठी एक संपर्क क्रमांक जाहीर करणे. या व्यतिरिक्त संस्थेद्वारे अन्य सामाजिक कल्याणकारी योजना राबविणे.

१४. CAPF जवानांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती/ भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र/ सार्वजनिक वाचनालय/ व्यायामशाळा व वसतिगृह आदी उपलब्ध/ निर्माण करणे करीत कार्य करणे.