अर्ध सैनिक परिवार कल्याण असोशिएशन, महाराष्ट्र मुख्यालय या संस्थेचे नियम व नियमावली
1) कार्य क्षेत्र :-
या संस्थेचे कार्य क्षेत्र महाराष्ट्र राहील.
2) हिशोबाचे वर्ष:-
या संस्थेचे हिशोबाचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे राहील.
3) सभासदत्व व त्यांची नोंदणीची पद्धत :
१८ वर्ष पूर्ण असलेल्या भारतीय नागरिकांना सदर संस्थेचे सभासदत्व हे जे महाराष्ट्र राज्यातील CAPF जवान त्यामध्ये सेवेमध्ये असणारे, सेवानिवृत्त असणारे किंवा त्यांच्यावर आश्रित कुटुंबातील व्यक्ती सदर संस्थेचे साधारण किंवा आजीव सभासद राहील. सदर सभासदत्व साठी संस्थेच्या अधिकृत वेबसाईट द्वारे नोंदणीकृत करावे, संस्थेद्वारे अर्ज व कागदपत्राची CAPF/आश्रित असल्याची पडताळणी संस्थेच्या या कार्यकारी मंडळा कडुन झाल्यावर सभासदत्व देण्यात येईल.
4) सभासदाचे प्रकार:- सभासदाचे दोन प्रकार राहतील.
आजीव सभासद– संस्थेला रु.5000/- फक्त सभासद वर्गणी देणाऱ्या \व्यक्तीला
आजीव सभासद म्हणून
समजण्यात येईल. आजीव सभासदास मतदान करणऱ्याचा व निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे
राहण्याचा अधिकार असेल.
साधारण सभासद– संस्थेला रु . 1000/- फक्त वार्षिक सभासद वर्गणी देणाऱ्या
व्यक्तीला साधारण सभासद म्हणून समजण्यात येईल. या सभासदांना निवडणुकीत भाग घेता
येनार नाही.
5) सभासदत्व रद्द होणे :-
कोणताही सभासद कायदेशीर गुन्हेगार ठरला असेल. सभासद वर्गणी दिले नसेल, मरण पावला असेल, देश सोडून परदेशात गेला असेल, व्यसनी झाला असेल , राजीनामा दिल्यास, गैरवर्तणूक करीत असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असे निदर्शनास आल्यास किंवा अन्य कारणावरून कार्यकारी मंडळाने बहुमताने ठराव मंजूर करून काढुन टाकल्यास सभासदत्व रद्द झाले असे समजले जाईल.
6) सर्व साधारण सभा आणि तिचे कार्ये:-
सर्व साधारण सभा ही सर्व श्रेष्ठ व शेवटचा निर्णय देणारी सभा म्हणून समजली जाईल. ही सभा वर्षातून एक वेळा तरी घेतली पाहीजे. या सभेत सर्व प्रकारचे सभासद भाग घेऊ शकतील. कार्यकारी मंडळाने चालवलेल्या कार्यावर नियंत्रण ठेवणे, वार्षिक हिशोब मंजूर करणे, पुढील नवीन वर्षाचे अंदाजपत्रकाला मंजूरी देणे, आवश्यकतेनुसार नियामात बदल करणे, कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करणे, ऐनवेळेवर येणार् या विषयावर निर्णय घेणे.
7) सर्व साधारण सभेची सुचना:-
सर्व साधारण सभेची सुचना 15 दिवस अगोदर देणे आवश्यक राहील. सुचने मध्ये दिनांक ,वेळ, ठिकाण व सभेचे विषय नमुद असावे. सुचना सर्व सदस्यांना संस्थेच्या डाकबुकवर सही घेऊन व् व्हॉट्सॲप, ईमेल, एस.एम.एस अथवा रजिस्टर्ड टपालाद्वारे संस्थेच्या योग्य त्या व्हॉट्सॲप ग्रुप / ईमेल ओनलाईन द्वारे पाठण्यात येईल. सुचना सभेच्या १५ दि वस अगोदर पाठवणे आवश्यक राहील.एकुण सभासद संख्येच्या २/३ सभासद उपस्थित झाल्यास सभेची गणसंख्या पूर्ण झाली असे समजण्यात येईल. गणसंख्ये अभावी सभा स्थगित झाल्यास , स्थगित सभेला कोरमचे बंधन राहणार नाही परंतु अशी टीप सुचना असणे आवश्यक राहील. कोरम अभावी सभेला धोरणात्मक निर्णय घेता येनार नाही.
8) विशेष सर्व साधारण सभा आणि तिचे कार्ये :-
अशी सभा आवश्यकतेनुसार केव्हाही घेता येईल. जी कार्ये सर्व साधारण सभा करू शकते ती सर्व कार्ये करण्याचा अधिकार विशेष सर्व साधारण सभेला राहील .
9) संस्थेचे कार्यकारी मंडळ व पदाधिकारी यांची रचना :-
संस्थेच्या कार्यकारी मंडळात कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 13 पदाधिकारी असु शकतील. त्यात पुढील पदाधिकारी समावेश राहील अध्यक्ष -1, उपाध्यक्ष -1, सचिव-1, सहसचिव-1, कोषाध्यक्ष -1, सदस्य असे कार्यकारी मंडळाचे सभासद राहतील.
10) कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ व निवडणुकीची पद्धत :-
कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ पाच (5) वर्षांनी राहील. निवडणुकीची पद्धत गुप्त मतदान पद्धतीने / पॅनल सर्व साधारण सभेत बहुमताने दर पाच वर्षांनी निवडले जाईल. नवीन कार्यकारी मंडळ निवडुन येई पर्यंत हे कार्यकारी मंडळ काम करेल.
11) कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व त्यांची कामे :-
अध्यक्ष – सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारून कामकाज चालवणे व हीतसंबधाने योग्य ते आदेश देणे संस्थेच्या कारभारावर व त्यांच्या शाखेवर नियंत्रण ठेवणे,नोटीस काढून सभा आयोजित करणे, रक्कमेची देवाण घेवाण करणे,
उपाध्यक्ष – संस्थेच्या अध्यक्षाच्या आदेशांचे पालन उपाध्याक्षांनी करावे, अध्यक्षाचे गैरहजेरीत अध्यक्षाचे
काम करणे अन्यथा अध्यक्षांना संस्थेच्या कामात योग्य ती मदत करणे.
सचिव – १) संस्थेच्या सभा बोलवणे. २) संस्थेचे पत्रव्यवहार करणे. ३) तक्रारीचे ननवारण करणे. ४) संस्थेच्या कमयिार्यावर लक्ष ठेवणे. ५) अध्यक्षांच्या परवानगीने सभा बोलावणे . ६) संस्थेच्या दृष्ट्टीने आवश्यक ते कोर्ट कचेरीची कामे करणे. ७) वार्षिक हिशोबाची पत्रके तयार करून ती सवय साधारण सभेपुढे ठेवणे. ८) रोज
हिशोब पाहून त्यावर सह्या करणे. ९) खर्चाची बिले मंजुर करणे. १०) संस्थेच्या वतीने रक्कमेचे देवाण
घेवाण करणे. ११) संस्थेच्या मालमत्ते चे देखरेख करणे. १२) मंजुर झालेले ठराव अमलात आणणे. १३)
संस्थेच्या दृष्ट्टीने हीतवाह असलेले इतर कोणतेही काम करणे.
सहसचिव – सचिवाचे गैरहजेरीत सचिवाचे काम करणे अन्यथा सचिवाला संस्थेच्या कामात योग्य ती मदत
करणे.
कोषाध्यक्ष – संस्थेच्या आर्थिक परिस्थिती नियंत्रण ठेवले, हिशोब लिहिणे, अगर ललहुन घेणे, हिशोब पूर्ण झाल्यावर कार्यकारी मंडळापुढे ठेवणे, हिशोबाचे पुस्तकातून वार्षिक पत्रके तयार करणे, रक्कमेचे देवाण
घेवाण करणे, ऑडीटर यांनी हिशोबातून काढलेल्या तृटीची पूर्तताकरणे इत्यादी.
कार्यकारी मंडळाचे सभासद– कार्यकारी मंडळाच्या सभेत व सर्वसाधारण सभेत उपस्थित राहणे. निवडणुकीच्या वेळी मतदान करणे व संस्थेच्या कामात आवश्यक ती मदत करणे.
इतर सभासद– सर्वसाधारण सभेत उपस्थित राहणे. निवडणुकीच्या वेळी मतदान करणे ( फक्त आजीव) व
संस्थेच्या कामात आवश्यक ती मदत करणे.
12) कार्यकारी मंडळाची सभा व मागणीची सभा :-
कार्यकारी मंडळाच्या वर्षातून कमीत 3 तीन सभा घेण्यात येतील. संस्थेच्या कोणत्याही दोन किंवा जास्त सभासदांची मागणी केल्यास अध्यक्षांची किंवा सचिवांची कार्यकारी मंडळाची सभा मागणी केल्यापासुन १५ दि वसाच्या आत बोलण्याचे बंधन राहील. अशी सभा बोलावतांना सुचनेत मागणी चे विषय नमुद करणे आवश्यक राहील. मागणीच्या सभेला काययकारी मंडळाचे सर्व अधिकार व नियम लागु राहील.
13) कार्यकारी मंडळाची सभेची सूचना व गणसंख्या :-
कार्यकारी मंडळाच्या सभेची सुचना दहा दिवस अगोदर देणे आवश्यक राहील. सुचनेमध्ये दिनांक , वेळ, ठिकाण , व सभेचे विषय नमुद करणे आवश्यक राहील. सुचना संस्थेच्या डाकबुकावर सही घेऊन अथवा रजिस्टर्ड टपालद्वारे पाठीवता येईल कार्यकारी मंडळाचे २/३ सभासद उपस्थित झाल्यास सभेची गणसंख्या पूर्ण झाली असे समजले जाईल. कोरम अभावी सभेला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.
14) कार्यकारी मंडळाचे निवडणुकीचे नियम :-
कार्यकारी मंडळाचे निवडणुकीचे नियम सर्व साधारण सभा ठरविल्या प्रमाणे राहील. ज्या सभासदाकडे संस्थेची कोणतीही रक्कम घेणे बाकी आहे अशा सभासदाला निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहता येणार नाही व मतदान करण्याचा सुद्धा हक्क राहणार नाही.
15) कार्यकारी मंडळातील रिक्त पदभिण्याबाबत :-
कोणत्याही कारणास्तव कार्यकारी मंडळातील पद/पदे रिक्त झाल्यास काययकारी मंडळाच्या सभेच्या बैठकीमध्ये आजीवन सभासदा मधून बहुमताने रिक्त पद/पदे भरता येतील.
16) कार्यकारी मंडळाचे अधिकार आणि कर्तव्य:-
कार्यकारी मंडळ सर्व कारभारावर नियंत्रण ठेवील. सर्व साधारण सभेने मंजूर केलेल्या ठरावाची पूर्तता करील.संस्थेच्या शाखा कार्यालयांना मान्यता देणे, ती काढून घेणे, संस्थेवर असलेल्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करणे, हिशोबावर नियंत्रण ठेवणे , तक्रारीची दाखल घेणे, कार्यकारी मंडळाचे रिक्त स्थान भरणे. सेवकाची नियुक्ती करणे, त्यांना काढून टाकणे व अन्य आवश्यक ती सर्व कामे करणे बहुमताने मंजूर झालेला ठराव कायदेशीर ठरवुन अमलात येईल.
17) संस्थेचा निधी मिळकत व विनियोग :-
सभासद फी, देणगी, वर्गणी व अनुदान संस्थेची व उत्पन्नाचे साधन राहील. संस्थेच्या उद्देशपूर्ती करिता निधी गोळा करता येईल व तो स्थावर स्वरुपाच्या मिळकतीसाठी गुंतावता येईल. अशी मिळकतीची नोंद पब्लिक ट्रस्ट रजिस्टर मध्ये अर्ज देऊन करावी लागेल.संस्थेच्या निधीचा वापर उद्देशांवर करण्यात येईल.
18) उद्दीष्ट निहाय खर्चाची तरतूद (टक्केवारी प्रमाणे) :-
ज्या उद्देशाने रक्कम गोळा केली असेल त्या उद्देशावर ती रक्कम १०० टक्के खर्चकरता येईल. तसेच कार्यकारी मंडळाने सर्व साधारण सभेत मंजुर केलेल्या उद्देशावर जमा केलेली रक्कम तेवढया प्रमाणात सर्व करता येईल.
19) कर्ज किंवा ठेवी यासंबधी तरतूद:-
संस्थेला आवश्यकता भासल्यास कोणत्याही व्यक्तीकडून किंवा बँकेकडून कर्ज किंवा ठेवी स्वीकारता येईल. त्याकररता में. धर्मदाय/सह आयुक्तांची पूर्ण परवानगी घेणे आवश्यक राहील.
20) स्थावर मालमत्ता खरेदी विक्री करणे बाबतची तरतूद:-
संस्थेला स्थावर मालमत्ता खरेदी करणे तसेच विक्री करण्याचा अधिकार राहील. संस्थेला त्या करता कार्यकारी मंडळाची बहुमताने समंती घ्यावी लागेल. संस्थेची स्थावर मालमत्ता विक्री करावयाची असल्यास ती विकण्यापूर्वी मा.धर्मदाय सह आयुक्तांची पूर्ण परवानगी घेणे आवश्यक राहील.
21) बँक खाते :-
संस्थेजवळ शिल्लक असलेली रक्कम कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा मान्यता असलेल्या शेड्यूल बँकेत संस्थेच्या नावाने ठेवता येईल. अध्यक्ष , सचिव व कोषाध्यक्ष या तीन पदाधिकाऱ्यां पैकी कोणत्याही दोन पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त सहीने रक्कम काढता येईल.
22) सभासदांची यादी ठेवण्याची पद्धत :-
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० कलम १५ अनुसार संस्थेचे जे सभासद असतील त्यांची एक यादी १९७१ चे संस्था नोंदणी महाराष्ट्र नियमातील नियम १५ प्रमाणे अनुसूची सहाचे नमुन्यात ठेवण्यात येईल. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० कलम ४ प्रमाणे व १९७१ चे संस्था नोंदणी महाराष्ट्र नियम ७ प्रमाणे दरवर्षी कार्यकारी मंडळाची यादी अनुसूची एक च्या नमुन्यात आपले प्रभागाचे सहाय्यक संस्था निबंधकाचे कार्यालयात पाठवावे लागेल.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० कलम ४-अ प्रमाणे १९७१ चे संस्था नोंदणी महाराष्ट्र नियम ८ प्रमाणे दरवर्षी संस्थेत नोकरीस लावलेल्या व्यक्तीच्या नोकरी संबंधी अटी बाबतचे विवरण अनुसूची दोनच्या नमुन्यात आपले विभागाचे सहाय्यक संस्था निबंधकाचे कार्यालयात पाठवावे लागेल.
23) नियम आणि नियमावतील बदल करण्याची तरतूद:-
संस्थेच्या नियम आणि नियमावतील बदल करण्याची असल्यास सर्व साधारण सभेत उपस्थित सभासदाच्या ३/५ बहूमताने ठराव मंजुर करून नियमावतील बदल करता येईल. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० कलम १२ प्रमाणे कार्यवाही पूर्ण करावी लागेल.
24) संस्थेच्या नावात व उद्देश्यात बदल करण्या बाबतची तरतूद:-
संस्थेच्या नावात व उद्देशात बदल करावयास झाल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० कलम १२ अथवा १२-अ प्रमाणे कार्यवाही पूर्ण करावी लागेल.
25) विसर्जन:-
संस्थेचे कार्य बंद करावयाचे असल्यास ३/५ सभासदांच्या बहुमताने सर्वसाधारण सभेत मंजुरी घ्यावी लागेल. संस्थेचे सर्व प्रकारचे व्यवहार पूर्ण करावे लागतील. तसेच संस्थेची शिल्लक मालमत्ता अन्य दुसऱ्या संस्थेला दान म्हणून देता येईल. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० कलम १३ व १४ प्रमाणे संस्था विसर्जनाची कार्यवाही पूर्ण करावी लागेल.